म्युच्युअल फंड म्हणजे काय?

म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय? 
आपल्याला नेहमी एकच प्रश्न पडतो कि म्युच्युअल फंडात काही फायदा होतो का?  म्युच्युअल फंड यात काही लॉस आहे का? काहींना तर म्युच्युअल फंड म्हणजे नुसताच Profit-Loss चा असाच खेळ वाटतो. काहीजण म्हणतात की हा शेअर्स बाजाराचा खेळ आहे. काहींना तर असचं वाटत असतं कि हे फक्त मोठ्या लोकांचेच काम आहे. पण म्युच्युअल फंड काही फायदे हि देऊ शकतात, ते कसे ते आपण पाहूया. आज आपण घरी अनेक कंपन्यांची उत्पादने वापरत असतो, पण अश्या कंपन्या चांगल्या आहे की वाईट हे सामान्य गुंतवणूकदाराला कळत नाही. कारण त्यासाठी लागणारा अभ्यास आणि वेळ आपल्याकडे नसतो. कारण आपण नोकरी करणार की शेअर्स बाजार विषयाचा अभ्यास करणार. म्हणून अश्या ठिकाणी आपले पैसे गुंतवले पाहिजेत जिथे आपल्याला 24 तास त्यासाठी लक्ष देण्याची गरज पडणार नाही. म्हणून म्युच्युअल फंड सर्वांसाठी गुंवणूक करण्यास खुले आहेत, म्युच्युअल फंडाची पूर्ण माहिती आपण प्ले स्टोर वरून फंडस् पाय अप डाउनलोड करून किंवा www.fundspi.com या वेबसाईटवर जाऊन मिळवू शकता. 

म्युच्युअल फंडस् नेमकं काय होत हे बघू :

१) फंड मॅनेजर एक उच्य शिक्षित मार्केटचा जाणकार  अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी(AMC) कडे तज्ञ लोकांची एक टीम असते, यामध्ये सर्वात महत्वाचा गुंतवणूक अधिकारी म्हणजे फंड मॅनेजर. ही मंडळी बाजाराचा कल पाहून, कंपन्यांच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन गुंतवणूकदारांच्या हिताचे निर्णय घेतात. त्यामुळे शेअर्स बाजार, रोखे इत्यादींचा जराही अभ्यास नसलेले गुंतवणूकदार म्युच्युअल फंडात गुंतवणुक करू शकतात.

2) कमीतकमी किती रुपये आपण इन्व्हेस्ट करू शकतो म्युच्युअल फंडात किमान गुंतवणूक 100 रुपये असते. त्यामुळे लहान गुंतवणूकदार देखील एका विस्तृत भागभांडारात पैसे गुंतवू शकतात. थेट पैसे गुंतवायचे तर कदाचित एक लाख रुपयांत शेअर्सचा बरा पोर्टफोलिओ बनवता येईल. रोखे बाजारात काही रोख्यांमध्ये किमान गुंतवणूक २५ लाख ते पाच कोटींची असू शकते. पण म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून छोटय़ा गुंतवणूकदारांना देखील यात पैसे गुंतवता येतात.

३) वेळ, पैसा आणि रिस्क कमी छोटय़ा गुंतवणूकदारांना बाजाराचे ज्ञान असेलच असे नाही. असले तरी बाजारावर लक्ष ठेवायला व नेहमी Update राहण्यासाठी लागणारा वेळ, पैसा ते कुठून आणणार हा महत्वाचा प्रश्न निर्माण होतोच. म्युच्युअल फंड हेच याचे एक सोपे व स्वस्त उत्तर आहे.

४) जोखीम कमी फायदे जास्त :- ज्या प्रमाणे गुंतवणूकदार एकाच कंपनीचे शेअर्स घेतो, त्यावेळी जोखीम हि तेवढीच वाढलेली असते. पण म्युच्युअल फंडात गुंतवणूकदाराने जरी 1000 रुपयाची गुंतवणूक केली, तरी ते विविध क्षेत्रातील सिक्युरिटीज मध्ये गुंतवणूक केली जाते. त्यामुळे आपोआपच जोखीम देखील कमी होते.

५) गरज पडल्यास पैसे काढण्याची सोय:- गुंतवणूकदाराला गरज लागेल तेव्हा फंड विकून त्याचे पैसे परत मिळतात. त्यामुळे ओपन एंडेड म्युच्युअल फंड योजना, लॉकिंग पीरियड असणाऱ्या विमा पॉलिसी, पीपीएफ व रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीपेक्षा सोयीस्कर ठरतात.

६) कर सवलत देखील घेऊ शकतो :- म्युच्युअल फंडात कर सवलत देणारे हि फंड उपलब्ध आहेत. यामध्ये कलम 80सी अंतर्गत करदाते दीड लाखापर्यंत(1.5 लाख) करलाभ घेऊ शकतो.



Comments

Popular posts from this blog

Build the most reliable Doctor Appointment booking app with Hepto Technologies

A GUIDE TO LAUNCH A RESTAURANT FINDER APP LIKE ZOMATO - Hepto Technologies

Launch Your Streaming Service With A Robust Netflix Clone App